इन्स्टाग्रामच्या वेब आवृत्तीवर डायरेक्ट मॅसेजची सुविधा

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्रामने आपल्या वेब आवृत्तीच्या युजर्ससाठी डायरेक्ट मॅसेज पाठविण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत.

इन्स्टाग्रामने आधीच आपल्या अ‍ॅपवर थेट संदेश पाठविण्याचे फिचर प्रदान केले असून याला युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेली आहे. आता हेच फिचर वेब आवृत्तीच्या युजर्सला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून युजर्सची एंगेटमेंट मोठ्या प्रमाणात वाढू शकते. विशेष करून याचा उपयोग करून युजर्स हे अन्य युजरसोबत चॅटींग करू शकतो. सध्या काही युजर्सला हे फिचर कार्यान्वित करण्यात आले असून लवकरच अन्य युजर्सलाही ही सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, डायरेक्ट मॅसेजच्या माध्यमातून इन्स्टाग्रामच्या युजर्सला एक महत्वाचे टुल मिळणार असून त्यांची एंगेजमेंट वाढणार असल्याची बाब निश्‍चित आहे. तथापि, यातून काही प्रश्‍नदेखील उपस्थित झाले आहेत. विशेष करून वेबवर थेट संदेश पाठविण्याची सुविधा दिल्यास सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. इन्स्टाग्रामवरील संदेशालाही एंड-टू-एंड एनक्रिप्शनचे अभेद्य कवच आहे. याला वेब इंटरफेसवर सादर केल्यास हे सुरक्षा कवच भंग होणार असल्याची भिती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेसबुकने गेल्या वर्षीच फेसबुक मॅॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या आपल्या तिन्ही सेवांना एकत्र करण्याची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामच्या वेब युजर्सला डायरेक्ट मॅसेजची देण्यात येणारी सुविधा ही या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here