इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये सहा प्रतिमा अपलोड करण्याची सुविधा

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी स्टोरी या फिचरमध्ये एकापेक्षा जास्त छायाचित्रे अपलोड करण्याची सुविधा प्रदान करणारे लेआऊट हे फिचर सादर केले आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी हे फिचर अतिशय लोकप्रिय असून याचा विपुल प्रमाणात वापर होत आहे. आता याच स्टोरीसाठी लेआऊट हे नवीन फिचर सादर करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत युजर मल्टीपल फोटो अपलोड करू शकतो. याआधी स्टोरीमध्ये एकच प्रतिमा वापरता येत होती. तर एकापेक्षा जास्त फोटोंचा वापर करायचा असल्यास काही थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करण्याशिवाय आतापर्यंत कोणताही पर्याय नव्हता. तथापि, आता लेआऊट हे फिचर देण्यात येत असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ अ‍ॅडम मोसेरी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे. त्यांनी चार छायाचित्रांच्या लेआऊटसह नवीन फिचरची माहिती दिली आहे. तर इन्स्टाग्रामच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याचा वापर नेमका कसा करावा याची माहिती देणारे ट्विट करण्यात आले आहे.

लेआऊट हे फिचर वापरण्यासाठी इन्स्टाग्रामचे युजर्स आपल्या गॅलरीतील प्रतिमांचा वापर करू शकतात. यासोबत युजर इन्स्टाग्रामचा कॅमेरा वापरूनही प्रतिमा अपलोड करू शकतात. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्ससाठी अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात येत असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे. इन्स्टाग्रामने युजर्सची एंगेजमेंट वाढविण्यासाठी अनेक फिचर्स देण्याचा सपाटा लावला आहे. यात आता लेआऊट या नवीन फिचरची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here