एलजीचा डब्ल्यू मालिकेत नवा स्मार्टफोन

0

एलजी कंपनीने डब्ल्यू १० अल्फा हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

एलजीने आधी डब्ल्यू या मालिकेत डब्ल्यू १०, डब्ल्यू ३० आणि डब्ल्यू ३० प्रो हे मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत. आता याच मालिकेत डब्ल्यू १० अल्फा हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य ९,९९९ रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

एलजी डब्ल्यू १० अल्फा या स्मार्टफोनमध्ये ५.७१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले दिलेला आहे. यात युनिसॉकचा ऑक्टा कोअर एससी९८६३ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूसह पुढेदेखील ८ मेगापिक्सल्सचे कॅमेरे प्रदान करण्यात आलेले आहेत. यात ३४५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here