आता वाढीव स्टोअरेजसह मिळणार रेडमी गो स्मार्टफोन

0

शाओमीने आपल्या रेडमी गो या स्मार्टफोनला आता वाढीव स्टोअरेजसह सादर केले असून याचे मूल्य ४,७९९ रूपये इतके आहे.

शाओमीने मार्च महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी रेडमी गो हे एंट्री लेव्हलचे मॉडेल लाँच केले होते. याचे मूल्य ४,४९९ रूपये असून याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हा स्मार्टफोन १ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायात सादर करण्यात आला होता. आता याचेच १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोअरेज असे नवीन व्हेरियंट सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य ४,७९९ रूपये असून ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतील. यातील उर्वरित फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच असतील.

रेडमी गो हा अँड्रॉइड गो ( ओरियो एडिशन) या आवृत्तीवर चालणारा आहे. ही आवृत्ती खास करून कमी रॅम व स्टोअरेजच्या स्मार्टफोनसाठी विकसित करण्यात आलेली आहे. या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४२५ हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस ८ तर समोर ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर यातील बॅटरी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here