नोबेल स्किओडोचा किफायतशीर एलईडी टिव्ही

0

नोबेल स्किओडोने भारतीय ग्राहकांसाठी किफायतशीर मूल्य असणारे दोन एलईडी टिव्ही सादर केले आहेत.

वेईरा ग्रुपची मालकी असणार्‍या नोबिेल स्किओडोने आधीही अनेक टिव्ही बाजारपेठेत सादर केले असून यात आता २४ (एनबी२४व्हीआरआय१) आणि ३२ इंची (एनबी३२आर०१) या मॉडेल्सची भर पडणार आहे. यांचे मूल्य अनुक्रमे ६,७९९ आणि ८,४९९ रूपये आहे. या दोन्ही मॉडेलमध्ये एचडी क्षमतेचे डिस्प्ले दिलेले आहेत. दोन्हींमध्ये ए+ दर्जाचे पॅनल दिलेले असून याच्या मदतीने यावर जिवंत चलचित्रांचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केलेले आहे. यात सिनेमा झूम हे विशेष फिचर दिले असून याच्या मदतीने युजर त्याला हवा असणारा भाग झूम करू पाहू शकतो.

या टिव्हींमध्ये प्रत्येकी १० वॅट क्षमतेचे दोन स्पीकर दिले असून यांच्या मदतीने उत्तम श्रवणानुभूती घेता येणार आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात दोन युएसबी तर एक एचडीएमआय पोर्ट दिलेले आहेत. यात अनेक अ‍ॅप्स आणि गेम्स हे प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here