अमेझॉनवरून मिळणार वनप्लस ७ ची ‘ही’ आवृत्ती

0

वनप्लसने आपल्या वनप्लस ७ या स्मार्टफोनची ‘मिरर ब्ल्यू’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून याला अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे.

वनप्लस कंपनीने अलीकडेच वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो हे दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन लाँच केले आहेत. यातील वनप्लस ७ या मॉडेलला प्रारंभी नेब्यूला ब्ल्यू, मिरर ग्रे आणि अलमंड या तीन रंगाच्या पर्यायात सादर करण्यात आले होते. हाच स्मार्टफोन आता मिरर ब्ल्यू या नवीन रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे. १५ जुलैपासून हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. याला ६ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज या पर्यायात ३२,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

वनप्लस ७ या मॉडेलमध्ये ६.४१ इंच आकारमानाचा, क्युएचडी (३२२० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा, १९:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा व फ्ल्युईड अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८५५ हा प्रोसेसर दिला आहे. याच्या मागील बाजूस दुहेरी कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. यात ४८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून याला ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याची जोड दिलेली आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा वाइड अँगलने युक्त असणारा कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय ९.० या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस ९.५ या आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here