ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज ओप्पो रेनो ३ प्रो स्मार्टफोन

0

ओप्पो कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा रेनो ३ प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात अनेक सरस फिचर्स आहेत.

ओप्पो या चीनी कंपनीने अलीकडेच रेनो ३ हे मॉडेल ग्राहकांना सादर केले होते. यातील प्रो आवृत्ती ही फाईव्ह-जी नेटवर्कच्या सपोर्टसह लाँच करण्यात आली होती. तथापि, याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर करतांना फोर-जी नेटवर्कच्या पर्यायातच उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात, भारतात लाँच करण्यात आलेल्या ओप्पो रेनो ३ प्रो या मॉडेलमध्ये फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे अर्थातच ड्युअल सेल्फी कॅमेरा होय. हे दोन्ही कॅमेरे डिस्प्लेवर असणार्‍या पंच होलमध्ये प्रदान करण्यात आलेले आहेत. यातील प्रमुख कॅमेरा ४४ मेगापिक्सल्सचा असून याला २ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सरची जोड देण्यात आली आहे. या दोन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार सेल्फी घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये अल्ट्रा नाईट सेल्फी मोडदेखील दिलेला आहे. याच्या मदतीने कमी उजेडातील सेल्फीदेखील चांगल्यात असतील. दरम्यान, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. तर याला १३ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स, ८ मेगापिक्सल्सचा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सल्सचा मोनो लेन्स या तीन अन्य कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. या चारही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उत्तम प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, ओप्पो रेनो ३ प्रो या मॉडेलमध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर पी९५ हा अद्ययावत प्रोसेसर आहे. यात ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २४०० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. यात इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला आहे. याचे ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट असून यांचे मूल्य अनुक्रमे २९,९९० आणि ३२,९९० रूपये आहे. ६ मार्चपासून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह यातील बॅटरी ४०२५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० या प्रणालीवर अधारित कलरओएस ७ या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here