पोको एफ-३ आणि एक्स-३ प्रो : जाणून घ्या सर्व फिचर्स

0
poco-f3-x-3-pro-launching-news-in-marathi

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणार्‍या पोको एफ-३ आणि एक्स-३ प्रो हे दोन स्मार्टफोन्सचे ग्लोबल लाँच झाले असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

शाओमीची उपकंपनी असणार्‍या पोकोने आजवर अनेक सरस मॉडेल्सला बाजारपेठेत लाँच केले आहे. या अनुषंगाने नुकत्याच जागतिक पातळीवर लाँच करण्यात अलेल्या पोको एफ-३ आणि एक्स-३ प्रो या दोन्ही मॉडेल्समध्येही अतिशय भन्नाट असे फिचर्स आहेत. हे दोन्ही मॉडेल्स ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले असून भारतात यांचे नेमके किती मूल्य असणार याबाबत मात्र कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. तरी हे चारही व्हेरियंट २० ते ३५ हजारांच्या किंमत पट्टयात उपलब्ध करण्यात येतील अशी शक्यता आहे. या सर्वांमध्ये फाईव्ह-जी नेटवर्क कनेक्टीव्हिटी असून ते ब्ल्यू, पर्पल आणि गोल्ड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

पोको एफ-३

पोको एफ-३ या मॉडेलमध्ये ६.६७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील १२० हर्टज् डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८७० हा अतिशय पॉवरफुल प्रोसेसर दिलेला आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यातील प्रमुख लेन्स ४८ मेगापिक्सल्सचे आहे. याला ८ मेगापिक्सल्सचे वाईड अँगल आणि ५ मेगापिक्सल्सच्या मायक्रो-लेन्सची जोड देण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. यात ४,२५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

पोको एक्स-३ प्रो

दरम्यान, पोको एक्स-३ प्रो या मॉडेलमध्ये तुलनेत सरस फिचर्स आहेत. यातही ६.६७ इंच आकारमानाचाच डिस्प्ले असला तरी फुल एचडी प्लस या प्रकारातील १२० हर्टझ डिस्प्ले आहे. याच्या मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप असून यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा आहे. तर याला ८ मेगापिक्सल्सचा एक आणि २ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर यातील सेल्फी कॅमेरा देखील २० मेगापिक्सल्सचा आहे. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह ५१६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here