रिअलमीचे स्वस्त आणि मस्त सी-१२ व सी-१५ स्मार्टफोन्स दाखल

0

रिअलमीने भारतीय ग्राहकांसाठी सी-१२ आणि सी-१५ हे दोन मॉडेल्स सादर केले असून यात किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

ओप्पोची उपकंपनी असणार्‍या रिअलमीने आज सी-१२ आणि सी-१५ हे दोन मॉडेल्स भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहेत. यातील सी-१५ हे मॉडेल ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ९,९९९ आणि १०,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. तर रिअलमी सी-१२ हे मॉडेल ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज या एका पर्यायात ८,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत उपलब्ध केले आहे.

यातील रिअलमी सी-१५ या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा मिनी ड्रॉप या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा हेलीओ जी ३५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप आहे. यातील प्रमुख कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून याला ८, २ आणि २ मेगापिक्सल्सच्या तीन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात तब्बल फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह ६,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.

तर, रिअलमी सी-१२ या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यातही मीडियाटेकचा हेलीओ जी ३५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून याला प्रत्येकी २ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. यात देखील ६,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here