रिअलमी एक्सच्या दोन नवीन आवृत्त्या सादर

0

रिअलमी एक्स या मॉडेलच्या स्पायडरमॅन आणि मास्टर या दोन नवीन आवृत्त्या भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आल्या आहेत.

ओप्पोची मालकी असणार्‍या रिअलमी ब्रँडने अलीकडेच रिअलमी एक्स हे मॉडेल सादर केले होते. याच स्मार्टफोनच्या आता स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम स्पेशल एडिशन आणि रिअलमी एक्स मास्टर्स एडिशन या दोन नवीन आवृत्त्या सादर करण्यात आल्या आहेत. ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेज या एकमेव पर्यायासाठी या दोन्ही आवृत्त्या उपलब्ध केलेल्या आहेत. नावातच नमूद असल्यानुसार या दोन्ही व्हेरियंटचे बाह्यांग हे थोडे बदलण्यात येणार आहे. याचा अपवाद वगळता यातील बहुतांश फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसार आहे. रिअलमी एक्स स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम स्पेशल एडिशन या आवृत्तीचे मूल्य २०,९९९ रूपये असून याला फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या ई-स्टोअरवरून उपलब्ध करण्यात आले आहे. तर रिअलमी एक्स मास्टर्स एडिशन ही आवृत्ती १९,९९९ रूपये मूल्यात ऑफलाईन या प्रकारात म्हणजेच देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आली आहे.

रिअलमी एक्स या मॉडेलमध्ये ६.५३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा तसेच १५:५:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा एज-टू-एज या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१० हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ४८ आणि ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा आहे. यातील बॅटरी ३७६५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर आधारित कलरओएस ६.० या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here