रिलायन्स जिओचा सारथी डिजीटल असिस्टंट कार्यान्वित

0

रिलायन्स जिओने सारथी या नावाने नवीन डिजीटल असिस्टंट कार्यान्वित केला असून याच्या मदतीने युजर्सला रिचार्ज करण्यासाठी मदत होणार आहे.

रिलायन्सच्या माय जिओ अ‍ॅपमध्ये सारथीला कार्यान्वित करण्यात आले आहे. याला १२ भारतीय भाषांमध्ये सादर करण्यात आले आहे. देशात सध्या विविध भाषांमधील युजर्सची संख्या लक्षणीय प्रमाणात असल्याने सारथीलादेखील भारतीय भाषांचा साज चढविण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही ऑनलाईन रिचार्ज करू शकणार आहे. यासाठी युजरला विविध रिचार्जची माहिती, त्याच्या पेमेंटचे डिटेल्स आदींबाबतची माहिती सुलभपणे मिळून हवा तो प्लॅन विकत घेता येईल. हा असिस्टंट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

जिओ सारथी हा डिजीटल असिस्टंट व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीवर काम करणारा आहे. देशात आधीच व्हाईस कमांडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असतांना रिलायन्स जिओचा सारथी युजर्ससाठी सादर करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here