सॅमसंग गॅलेक्सी ए ५१ स्मार्टफोनची ८ जीबी रॅमयुक्त आवृत्ती सादर

0

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए ५१ या स्मार्टफोनची ८ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.

सॅमसंगने फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी गॅलेक्सी ए ५१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला होता. याला ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज या पर्यायात उपलब्ध करण्यात आले होते. आता याच स्मार्टफोनची ८ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज ही आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. याचे मूल्य २७९९९ रूपये असून याला प्रिझम क्रश ब्लॅक, प्रिझम क्रश व्हाईट आणि प्रिझम क्रश ब्ल्यू या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यातील अन्य फिचर्स हे मूळ व्हेरियंट प्रमाणेच आहेत.

याच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ५ मेगापिक्सल्सचा मॅक्रो लेन्स, १२ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड लेन्स आणि अन्य ५ मेगापिक्सल्सचा एक अशा तीन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. या चारही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता सॅमसंग गॅलेक्सी ए५१ या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा एस अमोलेड या प्रकारातील इन्फीनिटी-ओ डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याच्या वरील बाजूस पंच होल या प्रकारातील फ्रंट कॅमेरा लावण्यात आलेला आहे. यात सॅमसंग कंपनीचाच एक्झीनॉस ९६११ हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट असणार आहेत. यात १५ वॅट फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अलाईव्ह इंटेलेजीयन्स आणि इंटिलेजीयंट किबोर्ड हे दोन विशेष फिचर्स दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here