भारतात मिळणार ४८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने सज्ज हा स्मार्टफोन !

0

ऑनर कंपनीने तब्बल ४८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा ऑनर व्ह्यू २० हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

ऑनरने अलीकडेच व्ह्यू २० या मॉडेलचे अनावरण केले होते. आता हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. याचे ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज मॉडेलचे मूल्य ३७,९९९ तर ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य ४५,९९९ रूपये असणार आहे. मिडनाईट ब्लॅक आणि सफायर ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन ३० जानेवारीपासून अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

यात तब्बल ४८ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात सोनी कंपनीचे आयएमएक्स५८६ हे सेन्सर प्रदान करण्यात आले आहे. या कॅमेर्‍यात एआय एचडी मोड दिलेला असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येणार आहे. यातील दुसरे वैशिष्ट्यपूर्ण फिचरमध्ये या मॉडेलमधील २५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा हा इन-डिस्प्ले या प्रकारातील आहे. अर्थात याच्या वरील भागातल्या नॉचऐवजी यातला फ्रंट कॅमेरा हा डिस्प्लेवरील ४.५ मिलीमीटर इतक्या लहान आकाराच्या छिद्राच्या म्हणजेच पंच होलच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यामुळे अर्थातच यात फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याआधी हुआवेने नोव्हा ४ या स्मार्टफोनमध्ये याच प्रकारातील फ्रंट कॅमेरा दिला होता. यानंतर ऑनर व्ह्यू २० हा हे फिचर असणारा दुसरा स्मार्टफोन बनला आहे.

ऑनर व्ह्यू २० या मॉडेलमध्ये लिंक टर्बो हे दुसरे वैशिष्ट्यपूर्ण फिचर दिले आहे. याच्या अंतर्गत सर्वोत्तम इंटरनेट नेटवर्कमध्ये अतिशय सुलभपणे स्वयंचलीतरित्या शिफ्ट करण्याची सुविधा दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here