स्नॅप स्पेक्टॅकल्स भारतात लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

स्नॅपचॅटने आपल्या ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानावर आधारित असणारे स्नॅप स्पेक्टॅकल्स भारतात सादर केले असून याचे मूल्य १४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहेत.

ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजेच विस्तारीत सत्यता हे तंत्रज्ञान अतिशय भन्नाट असून याचा विविधांगी वापर करणे शक्य आहे. यातील एक उत्कंठावर्धक वापर म्हणजे स्मार्ट ग्लास होय. खरं तर, गुगलने गुगल ग्लास या स्मार्ट ग्लासच्या माध्यमातून यात दमदार पदार्पण केले असले तरी नंतर त्यांनी मात्र हा प्रोजेक्ट गुंडाळून ठेवला. मध्यंतरी गुगल ग्लास नवीन स्वरूपात सादर होणार असल्याची माहिती समोर आली होती. हे सुरू असतांना स्नॅपचॅट कंपनीने याच प्रकारातील स्पेक्टॅक्लस सादर केले. आजवर स्पेक्टॅकल्स-२ आणि स्पेक्टॅकल्स-३ या दोन आवृत्त्या बाजारपेठेत सादर करण्यात आला असून याला युजर्सचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आता हेच दोन मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

स्पेक्टॅकल्स २ हा स्मार्ट गॉगल युजरला छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रीकरण करून याला स्नॅपचॅटवर शेअर करण्याची सुविधा देतो. यात चष्म्याच्या बाजूला असणार्‍या बटनावर क्लिक करून कुणीही फोटो वा व्हिडीओ घेऊ शकतो. स्पेक्टॅकल्स-२ या मॉडेलमध्ये एक कॅमेरा दिला असून तो १२१६ बाय १२१६ पिक्सल्स या क्षमतेचे व्हिडीओ तर १६४२ बाय १६४२ पिक्सल्स क्षमतेचे फोटो घेऊ शकतो. यात ४ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज असून या माध्यमातून ७० स्टोरीज अपलोड करता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर स्पेक्टॅकल्स ३ हे मॉडेल अद्ययावत असून यामध्ये दोन कॅमेरे असून यांच्या मदतीने थ्री-डी अर्थात त्रिमीतीय फोटो व व्हिडीओ घेता येतात. यातील फोटो व व्हिडीओचे रेझोल्युशन हे अनुक्रमे १७२७ बाय १७२७ पिक्सल्स आणि १२१६ बाय १२१६ पिक्सल्स इतके असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात देखील ४ जीबी रॅम प्रदान करण्यात आली आहे. यात चार मायक्रोफोन दिले असून याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार ध्वनीची अनुभूती येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातील स्पेक्टॅकल्स २ या मॉडेलचे मूल्य १४,९९९ तर स्पेक्टॅकल्स ३ चे मूल्य २९,९९९ रूपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here