‘गुगल पे’ वरून लवकरच गोल्ड गिफ्टच्या स्वरूपात पाठविण्याची सुविधा

0

‘गुगल पे’ या वॅलेटवरून युजर्सला लवकरच सोने हे कुणालाही भेट म्हणून पाठविण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

‘गुगल पे’ या वॅलेटवरून गत मार्च महिन्यातच सोन्याची खरेदी-विक्री सुरू करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. याच्या अंतर्गत गुगलने भारतात एमएमटीसी-पीएएमपी या ख्यातप्राप्त रिफायनरीच्या मदतीने युजर्सला ९९.९९ टक्के शुध्द २४ कॅरेट सोन्याची खरेदी वा विक्री करण्याची सुविधा दिलेली आहे. यानंतर आता या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार लवकरच सोने गिफ्ट म्हणून पाठविण्याची सुविधा युजर्सला प्रदान करण्यात येणार आहे. गुगल पे अ‍ॅपच्या डेव्हलपर्ससाठी असणार्‍या नवीन आवृत्तीत याचे संकेत मिळाले आहेत. याच्या कोडमध्ये गोल्ड गिफ्टचे सूतोवाच करण्यात आलेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये याला प्रयोगात्मक (बीटा) अवस्थेत देण्यात येणार असून चाचणी झाल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

फेसबुकने अलीकडेच ‘फेसबुक पे’ या प्रणालीच्या माध्यमातून गुगल पे ला तगडे आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. फेसबुक मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर फेसबुक पे वापरले जाणार आहे. तर ‘गुगल पे’ वॅलेट हे कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. फेसबुक पे सर्व युजर्ससाठी उपलब्ध होण्याआधीच गुगलने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गोल्ड गिफ्ट करण्याची सुविधा दिल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here