लवकरच फेसबुक स्टोरीला इन्स्टाग्रामवर शेअर करता येणार

0

फेसबुकचे युजर्स लवकरच आपली स्टोरी ही इन्स्टाग्रामवर शेअर करू शकणार असून याची चाचणी आता सुरू झालेली आहे.

सध्या इन्स्टाग्रामची स्टोरी ही फेसबुकवर शेअर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. तर व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस्देखील स्टोरी म्हणून फेसबुकवर शेअर करता येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता फेसबुकवरील स्टोरी ही इन्स्टाग्रामवर शेअर करता येणार आहे. काही युजर्सच्या माध्यमातून या फिचरची चाचणी घेण्यात येत असल्याची माहिती टेकक्रंच या टेक पोर्टलने एका वृत्ताच्या माध्यमातून दिली आहे.

मार्क झुकरबर्गने आपली मालकी असणार्‍या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅप या तिन्ही सेवांना एकत्र करण्याचे संकेत आधीच दिलेले आहेत. या अनुषंगाने या तिन्ही डिजटल मंचांना क्रॉस प्लॅटफॉर्म या पध्दतीत एकमेकांशी संलग्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. याचा विचार करता, फेसबुक स्टोरीला इन्स्टाग्रामसोबत संलग्न करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यातून अधोरेखीत झालेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे फिचर सर्व युजर्सला वापरायला मिळेल असे टेकक्रंचच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here