व्हाटसअ‍ॅपच्या स्टेटसमध्ये दिसणार जाहिराती

0

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच स्टेटसमध्ये जाहिराती दिसणार असून हे फिचर क्रमाक्रमाने कार्यान्वित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हाटसअ‍ॅपमध्ये जाहिराती येणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले असून याची निवडक युजर्सच्या माध्यमातून यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आलेली आहे. यामुळे आता हे फिचर सर्व युजर्सला देण्यात येणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सला हे फिचर क्रमाक्रमाने देण्यात येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवरील स्टेटस् हे अतिशय लोकप्रिय असे फिचर आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्याला हवी असणारी प्रतिमा वा व्हिडीओ अपलोड करू शकतो. यात ३० सेकंदापर्यंतचा व्हिडीओ वापरता येतो. स्टेटस् अपडेट केल्यानंतर ते बरोबर २४ तासांनी नष्ट होते. दरम्यान, व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला मेन नेव्हीगेशनवर स्टेटस् या नावाने स्वतंत्र विभाग देण्यात आला असून यावर क्लिक केल्यान त्याच्या मित्रमंडळीत कुणीही स्टेटस् अपडेट केले असल्यास याची माहिती येथे मिळू शकते. याच विभागात जाहिराती दिसणार आहेत. यात युजरला संबंधीत कंपनीचे नाव ठळकपणे दिसणार असून यावर क्लिक केल्यानंतरच युजरला संबंधीत जाहिरात पूर्णपणे दिसणार आहे. पहिल्या टप्प्यात व्हाटसअ‍ॅपने निवडक कंपन्यांशी करार केला असून काही महिन्यांमध्ये याची व्याप्ती वाढविण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here