साध्या स्पीकरला ‘स्मार्ट’ बनविणार हे उपकरण !

0

कोणत्याही साध्या स्पीकरला ‘स्मार्ट’ बनविण्यास सक्षम असणारे इको इनपुट हे उपकरण अमेझॉनने भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे.

सध्या बाजारपेठेत स्मार्ट स्पीकर्सची धुम आहे. अतिशय किफायतशीर मूल्यातील गुगल होम, अमेझॉन इको आदी मालिकांमधील विविध मॉडेल्स भारतीय युजर्सला भावले आहेत. यात ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्स पार पाडण्याची सुविधा दिलेली असते. एकीकडे स्मार्ट स्पीकर लोकप्रिय होत असतांना दुसरीकडे स्मार्ट नसणार्‍या स्पीकरमध्येही याच प्रकारची सुविधा कशी मिळेल ? याबाबतही प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगाने अमेझॉनने भारतीय ग्राहकांसाठी ‘इको इनपुट’ हे उपकरण सादर केले आहे. हे डिव्हाईस कोणत्याही सर्वसाधारण स्पीकरला कनेक्ट करता येणार आहे. एकदा का हे उपकरण कनेक्ट केले ती साधा स्पीकरदेखील ‘स्मार्ट’ बनणार आहे. अर्थात साध्या स्पीकरवरूनही अमेझॉनच्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला वापरता येणार आहे. यामुळे साधा स्पीकर हा स्मार्ट स्पीकरमध्ये अगदी सुलभपणे परिवर्तीत होणार आहे.

इको इनपुट हे उपकरण चकतीच्या आकाराचे आहे. यामध्ये चार अतिशय संवेदनशील मायक्रोफोन लावण्यात आलेले आहेत. यांच्या मदतीने कुणीही युजर व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा वापर करू शकतो. हे उपकरण साध्या स्पीकरला ऑडिओ जॅक अथवा ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येते. यावरून युजर अलेक्झा या असिस्टंटच्या मदतीने विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. हे उपकरण २,९९९ रूपये मूल्यात अमेझॉन इंडियासह देशभरातील मोजक्या शॉपीजमधून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

पहा : अमेझॉन इको इनपुटची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here