शाओमीने आपल्या रेडमी नोट ७ प्रो या स्मार्टफोनचे नवीन व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.
शाओमीने या वर्षी मार्च महिन्यात रेडमी नोट ७ प्रो हे मॉडेल लाँच केले आहे. याला ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. आता हाच स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेजच्या पर्यायात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य १५,९९९ रूपये असून याला फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या मी स्टोअरवरून उपलब्ध करण्यात आलेले आहे. यातील अन्य फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच असणार आहेत.
अर्थात, शाओमी रेडमी नोट ७ प्रो या मॉडेलमध्ये मागील बाजूस तब्बल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. यातील एक कॅमेरा हा सोनीच्या आयएमएक्स५८६ सेन्सरने युक्त असून याची क्षमता ४८ मेगापिक्सल्सची आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून तो प्रतिमेची डेप्थ मापन करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्रामार ग्लास डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरणदेखील देण्यात आले आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर आधारित मीयुआय १० या प्रणालीवर चालणारा असून यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Mi fans, you asked for it and here it is!😍
Introducing 6GB+64GB variant of the #RedmiNote7Pro. Get this #48MP Camera Beast at honest price = ₹15,999! 📸
You can get it tomorrow at 12 PM from https://t.co/pMj1r7lwp8 and @flipkart.
RT if you are getting one. 🔄 #Xiaomi ❤️ pic.twitter.com/5stUdw7eSk
— Manu Kumar Jain (@manukumarjain) July 2, 2019