शाओमीचा ४८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने सज्ज स्मार्टफोन

0

शाओमीने तब्बल ४८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा रेडमी नोट ७ एस हा स्मार्टफोन आज भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

गत अनेक दिवसांपासून शाओमी रेडमी नोट ७एस या मॉडेलबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले होते. कंपनीने आधीच यात ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल असे सूतोवाच केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. शाओमीने याआधी ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असणारा रेडमी नोट ७ प्रो हा स्मार्टफोन आधीच लाँच केला आहे. यातदेखील याच क्षमतेचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. खरं तर यात ड्युअल कॅमेरा असून मुख्य कॅमेरा ४८ तर दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी नोट ७एस या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या वरील भागात नॉच दिलेला असून संरक्षणासाठी यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ दिलेला आहे. याचे ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट सादर करण्यात आलेले आहेत. यामध्ये क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज ४.० या तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ९.० पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा मीयुआय हा युजर इंटरफेस असणार आहे.

शाओमी रेडमी नोट ७एस या मॉडेलच्या ३ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्य १०,९९९ तर ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्य १२,९९९ रूपये आहे. हे दोन्ही व्हेरियंटस् ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून २३ मे पासून खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here