दोन व्हेरियंटमध्ये मिळणार शाओमी मी ए ३ स्मार्टफोन

1

शाओमीने अँड्रॉइड वन या प्रोग्रॅमच्या अंतर्गत मी ए ३ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

शाओमीने गेल्या महिन्यात स्पेनमध्ये मी ए३ हा स्मार्टफोन सादर केला होता. नावातच नमूद असल्यानुसार हा मी ए२ या मॉडेलची पुढील आवृत्ती आहे. याला ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज (मूल्य १२,९९९) आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य १५,९९९) या दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. नॉट जस्ट ब्ल्यू, मोअर दॅन व्हाईट आणि काइंड ऑफ ग्रे या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल्स अमेझॉन इंडिया आणि मी.कॉम या संकेतस्थळांसह कंपनीच्या देशभरातील शॉपीजमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

शाओमी मी ए३ या मॉडेलमध्ये ६.०८ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असून यावर वॉटरड्रॉप नॉच दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅगर्ड्रगन ६६५ हा प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला वाईड अँगल व्ह्यू युक्त ८ मेगापिक्सल्स आणि डेप्थ सेन्सरयुक्त २ मेगापिक्सल्सच्या अन्य दोन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह यातील बॅटरी ४०३० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा आहे. वर नमूद केल्यानुसार याला अँड्रॉइड वन या प्रोजेक्टच्या अंतर्गत सादर करण्यात आल्याने अँड्रॉइड प्रणालीच्या सर्व ताजे अपडेटस् याला त्वरीत मिळतील.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here