चार कॅमेर्‍यांनी सज्ज असेल शाओमीचा ‘हा’ स्मार्टफोन

0

शाओमी लवकरच रेडमी नोट ८ प्रो हा स्मार्टफोन सादर करणार असून यात २५ एक्स झूमच्या सुविधेसह चार कॅमेर्‍यांसह अनेक सरस फिचर्सचा समावेश असेल असे स्पष्ट झाले आहे.

शाओमीने एका टिझरच्या माध्यमातून रेडमी नोट ८ प्रो या मॉडेलच्या लॉचींगवर शिक्कामोर्तब केले आहे. या टिझरमधून बर्‍याच बाबींचे आकलन झाले आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे शाओमीच्या या स्मार्टफोन मध्ये २५ एक्स इतका झूम असू शकतो. या टीजर मध्ये एका पोपटाचा फोटो शेयर केलेला आहे यात शाओमी दावा करतं कि हा स्मार्टफोन पोपटाचे केस सुद्धा स्पष्ट दाखवू शकतो. या टीजर वरून असं कळतं कि रेडमी नोट ८ प्रो मध्ये असणारा ६४ मेगापिक्सएलचा कॅमेरा असू शकतो. आता इतका दणदणीत कॅमेरा म्हटल्यावर हा नक्कीच जबरदस्त फोटो घेणार यात शंकाच नाही. अजून एका टीजर द्वारे शाओमी दावा करत आहे कि हा फोन ९२४८ बाय ६९३६ पिक्सेल रिजोल्यूशनचे फोटो घेऊ शकेल. म्हणजेच हा कॅमेरा ८ के क्षमतेपेक्षा अधिक उत्तम प्रतिमा घेऊ शकणार असल्याची बाब उघड आहे.

रेडमी नोट ८प्रो मध्ये हिलिओ जी ९० टी हा प्रोसेसर असून यावर चालणारा हा पहिलाच स्मार्टफोन असेल हे विशेष. या स्मार्टफोन मध्ये ६४ मेगापिक्सेल सोबत अजून ३ कॅमेरे असणार आहे म्हणजे यात एकूण ४ कॅमेर्‍यांचा सेटअप असू शकतो. या कॅमेर्‍यांच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला नसल्याची बाब ही थोडी खटकणारी आहे. दरम्यान, रेडमी नोट ८ प्रो मध्ये दमदार बॅटरी असणार आहे पण याच्या क्षमतेला गुपित ठेवण्यात आलेलं आहे. तसेच याचे स्क्रीन-टू-बॉडी हे गुणोत्तर रेडमी नोट ७ पेक्षा जास्त असणार आहे. रेडमी नोट ८ आणि रेडमी नोट प्रो २९ ऑगस्टला चीन मध्ये लाँच होणार आहे. यानंतर लागलीच याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. शाओमीचा रेडमी नोट ८ प्रो ओप्पोच्या रेनो २ ला जबरदस्त टक्कर देऊ शकतो. ओप्पो रेनो २ मध्ये २० एक्स झूम असेल अशी चर्चा असून यात चार कॅमेरे सुद्धा असणार आहे. यामुळे या दोन्ही मॉडेल्समध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होऊ शकते.

:- विशाल टकले-पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here