चार कॅमेर्‍यांसह उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज रेडमी नोट ८ मालिका

0

शाओमीने रेडमी नोट ८ आणि नोट ८ प्रो हे दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्स बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून यात चार रिअर कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

गत अनेक दिवसांपासून रेडमी नोट ८ आणि रेडमी नोट ८ प्रो या मॉडेल्सबाबत टेक विश्‍वात मोठ्या प्रमाणात औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज चीनमधील एका शानदार कार्यक्रमात या दोन्ही फ्लॅगशीप मॉडेल्सचे अनावरण करण्यात आले. या दोन्ही मॉडेल्समध्ये अनेक सरस फिचर्स आहेत. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे याच्या पाठीमागे चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यात रेडमी नोट ८ या मॉडेलमधील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला १२० अंशातील वाईड अँगलने युक्त असणारा ८ मेगापिक्सल्सचा; मॅक्रो लेन्सयुक्त २ मेगापिक्सल्सचा तर डेप्थ सेन्सरयुक्त २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड प्रदान करण्यात आली आहे. या कॅमेर्‍यांमध्ये नाईट मोड हे विशेष फिचर असून याच्या मदतीने अतिशय अंधुक प्रकाशातही दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर रेडमी नोट ८ प्रो या मॉडेलच्या मागील बाजूस ६४ मेगापिक्सल्सचा प्रमुख कॅमेरा असून याला ८, २ आणि २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड दिली आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सल्सचा असेल.

शाओमी रेडमी नोट ८ या मॉडेलमध्ये ६.३ तर रेडमी नोट ८ प्रो या मॉडेलमध्ये ६.५३ इंच आकारमानाचा, डॉट नॉच या प्रकारातील डिस्प्ले दिलेले आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये अनुक्रमे ४,००० आणि ४,५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीज देण्यात आलेल्या आहेत. शाओमी रेडमी नोट हे मॉडेल ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये मिळेल. तर रेडमी नोट ८ प्रो या मॉडेलला ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज; ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज या तीन पर्यायात उपलब्ध करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here