किफायतशीर मूल्याचा झोलो इरा ४ एक्स स्मार्टफोन

0

झोलो कंपनीने अतिशय किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा इरा ४ एक्स हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला आहे.

झोलो कंपनीने आजवर एंट्री लेव्हलच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने इरा ४ एक्स हा स्मार्टफोनदेखील याच वर्गवारीतील आहे. याचे मूल्य ४,४४४ रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतील. यासोबत ३० दिवसांची मनी बॅक ऑफरदेखील देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनचे मूल्य तुलनेत कमी असले तरी यामध्ये फेस अनलॉक हे फिचर देण्यात आलेले आहे. तथापि, यामध्ये सध्या प्रचलीत असणारे फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले नाही. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यामध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, झोला इरा ४ एक्स या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५ डी वक्राकार डिस्प्ले दिलेला आहे. यावर संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरणदेखील दिलेले आहे. यातील प्रोसेसर, रॅम आणि स्टोअरेजबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here