अँड्रॉइड मॅसेजमध्ये व्हेरिफाईड एसएमएसची सुविधा

0

गुगलने आपल्या अँड्रॉइड मॅसेज या अ‍ॅपमध्ये व्हेरिफाईड एसएमएस आणि स्पॅम प्रोटेक्शन हे दोन नवीन फिचर्स सादर केले आहेत.

गुगलचे अँड्रॉइड मॅसेज हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या पार्श्‍वभूमिवर, हे अ‍ॅप वापरणार्‍यांना आता गुगलने व्हेरिफाईड एसएमएस आणि स्पॅम प्रोटेक्शन ऑफ मॅसेजेस हे दोन महत्वपूर्ण फिचर्स प्रदान केले आहेत. नावातच नमूद असल्यानुसार व्हेरिफाईड मॅसेजेसमध्ये नोंदणीकृत असणार्‍या क्रमांकावरून आलेले संदेश पाठविण्यात येणार आहेत. यात मॅसेज पाठविणार्‍याने आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे अनिवार्य राहणार आहे. यामुळे मॅसेज रिसिव्ह करणार्‍यांना संबंधीत संदेश हा व्हेरिफाईड क्रमांकावरून आल्याची माहिती मिळणार आहे. यात संबंधीत कंपनी वा संस्थेचे नाव आणि बोधचिन्हाचा समावेश राहणार आहे. अनेकदा अनोळखी क्रमांकावरून येणारे मॅसेज हे त्रासदायक ठरत असतात. या पार्श्‍वभूमिवर, व्हेरिफाईड एसएमएस हे फिचर युजर्ससाठी अतिशय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासोबत गुगलने स्पॅम प्रोटेक्शनची सुविधादेखील प्रदान केली आहे. याच्या अंतर्गत कोणत्याही एसएमएसमध्ये संशयास्पद लिंक वा मालवेअर असल्याची याचा अलर्ट संबंधीत युजरला दिला जाणार आहे. यामुळे त्या लिंकवर क्लिक करणे टाळून तो युजर सुरक्षित राहू शकतो. स्पॅम मॅसेजेस ही आजच्या युगातील खूप मोठी समस्या बनली आहे. या पार्श्‍वभूमिवर, स्पॅम प्रोटेक्शनच्या माध्यमातून यापासून युजर्सची मुक्तता होऊ शकते. यामुळे हे फिचरदेखील युजर्सला फायदेशीर ठरणार आहे.

व्हेरिफाईड एसएमएस आणि स्पॅम प्रोटेक्शन हे फिचर पहिल्यांदा अमेरिकेत देण्यात आले असून ते क्रमाक्रमाने कॅनडा, भारत व युरोपसह अन्य देशांमधील युजर्सला प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here