अँड्रॉइड वेअरचे नाव बदलणार

0

गुगलने अँड्रॉइड वेअरचे नाव बदलून याला वेअरओएस या नावाने नव्याने लाँच करण्याचे संकेत दिले आहेत.

गुगलची अँड्रॉइड वेअर ही ऑपरेटींग प्रणाली स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर्स, स्मार्टबँड आदी उपकरणांमध्ये वापरली जात आहे. आता मात्र अँड्रॉइड वेअरचे नाव बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. याऐवजी वेअरओएस ही ऑपरेटींग सिस्टीम सादर करण्यात येणार आहे.

गुगलने आपल्या अँड्रॉइड पी या आगामी आवृत्तीचा प्रिव्ह्यू जगभरातील युजर्ससाठी सादर केला होता. यात वेअरओएसचा आयकॉन्ससह अन्य प्राथमिक माहितीचे स्त्रोत आढळून आले आहेत. यामुळे गुगल लवकरच ही नवीन प्रणाली सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही प्रणाली वेअरेबल्ससाठी वापरण्यात येणार आहे. अर्थात अँड्रॉइड वेअर या विद्यमान प्रणालीत काही बदल करून याला नवीन नावाने सादर करण्यात येणार असल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. अ‍ॅपलने स्मार्टवॉचसाठी स्वतंत्र वॉचओएस सादर केली आहे. याला आव्हान देण्यासाठी वेअरओएस ही ऑपरेटींग सिस्टीम अस्तित्वात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मे महिन्याच्या प्रारंभी होणार्या गुगलच्या आय/ओ परिषदेत याबाबत घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here