अथेर ई-स्कूटर बाजारपेठेत दाखल

0

अथेर एनर्जी या स्टार्टपने देशात अथेर ३४० आणि अथेर ४५० या दोन ई-स्कूटर उतारण्याची घोषणा केली आहे.

अथेर एनर्जी या बंगळुरू येथील स्टार्टपने आधीच आपल्या ई-स्कूटर मॉडेल्सचा प्रोटोटाईप सादर केला होता. यामुळे याबाबत देशभरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता अथेर ३४० आणि अथेर ४५० या नावांनी याचे दोन मॉडेल्स बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. यांचे ऑन-रोड मूल्य अनुक्रमे १.०९ आणि १.२४ लाख रूपये असेल. याशिवाय अन्य व्हॅल्यु-अ‍ॅडेड सेवांसाठी ग्राहकाला ७०० रूपये महिना इतका मोजावा लागणार आहे. यात मेंटेनन्ससह सॅटेलाईट नेव्हिगेशन प्रणालीच्या आकारणीचाही समावेश आहे. ही सेवा घेणार्‍यांना कंपनीच्या ग्रीडमध्ये मोफत चार्ज करण्याची सुविधाही मिळणार आहे. पहिल्यांदा याला बंगळुरूत लाँच करण्यात आले असले तरी या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये याला उपलब्ध करण्यात येणार आहे.

अथेर ३४० आणि अथेर ४५० या दोन्ही ई-स्कूटर फास्ट चार्जींगच्या सपोर्टने सज्ज आहेत. यात लिथीयम आयन बॅटरीज असून यातून पहिल्यात ४.४ तर दुसर्‍या मॉडेलमध्ये ५.४ हॉर्स पॉवरची निर्मिती होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. अथेर ३४० या मॉडेलचा कमाल वेग ७० किलोमीटर प्रति-तास तर अथेर ४५०चा वेग ८० किलोमीटर प्रति-तास इतका आहे. एकदा चार्ज केल्यानंतर अथेर ३४० मॉडेल ६० तर अथेर ४५० हे मॉडेल ७५ किलोमीटरपर्यंत धावू शकत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

अथेर ३४० आणि अथेर ४५० या दोन्ही मॉडेल्सची डिझाईन अतिशय आकर्षक अशी आहे. यामध्ये ७ इंच आकारमानाचा टचस्क्रीनयुक्त इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. याला स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. यावर नेव्हिगेशनसह नोटिफिकेशन्सची सुविधा देण्यात आलेली आहे. तर हे टचस्क्रीन पॅनल वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ असल्यामुळे ही ई-स्कूटर अगदी कोणत्याही वातावरणात वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here