अनोखी तीन चाकी कार !

0

एलिओ या अमेरिकन कंपनीने टु सीटर तसेच तीन चाकी कार तयार केली असून याला बाजारपेठेत उतरवण्यासाठी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून भांडवल जमा करण्यास सुरूवात केली आहे.

सध्या जगभरात कन्सेप्ट कार अर्थात नवनवीन अभिनव संकल्पनांवर आधारित चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात सादर करण्यात येत आहेत. यातच एलिओ या कंपनीने आपली तीन चाकी कार सादर केली आहे. या कारला पुढे दोन तर मागे एक चाक आहे. यात दोन जण आरामात प्रवास करू शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही कार मायलेजच्यादृष्टीने अतिशय उत्तम अशीच आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ती तब्बल ३५.७१ किलोमीटर इतकी धावू शकते. याचे डिझाईन हे नाविन्यपुर्ण असेच आहे. याचा आकार हा लोकांचे आकर्षण वेधून घेणारा असल्याने ही कार अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

एलिओ मोटर्सने ही कार ६८०० डॉलर्समध्ये ग्राहकांना देण्याची घोषणा केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही घोषणा होऊन काही दिवस उलटत नाही तोच तब्बल ४५ हजार कारची अगावू नोंदणी करण्यात आली आहे. अर्थात ही कार व्यावसायिक पातळीवर उपलब्ध करण्यासाठी एलिओ मोटर्सला तब्बल तीन कोटी डॉलर्सची आवश्यकता आहे. यासाठी त्यांनी क्राऊडफंडिंगचा मार्ग पत्करला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here