अफलातून हायब्रीड ड्रोन

0

आपण हवेत उडणारे अथवा पाण्यात विहार करणारे ड्रोन पाहिले असेल. आता मात्र तंत्रज्ञांनी या दोन्ही प्रकारे कार्यान्वित होणारे हायब्रीड ड्रोन तयार केले आहे.

ड्रोन म्हटले की, हवेत उडणार्‍या उपकरणांचे चित्र आपल्यासमोर येते. गत काही वर्षांपासून पाण्यात फिरणारे ड्रोन देखील तयार करण्यात आले आहे. मात्र आता या दोन्ही प्रकारे काम करणारे ड्रोन तयार करण्यात आले आहे. २०१७ फ्युचर नेव्हल फोर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्सपो या प्रदर्शनात नेव्हियेटर या नावाने हे मॉडेल जगासमोर पहिल्यांदा प्रदर्शीत करण्यात आले आहे. यात हवेत उड्डाण करण्यासाठी चार पंख तर पाण्यातून विहार करण्यासाठी आवश्यक असणारे प्रॉपेलर्स देण्यात आले आहेत. रूटगिअर्स विद्यापीठातील तंत्रज्ञानांच्या एका चमूने हे ड्रोन विकसित केले आहे. नौदलात या प्रकारचे ड्रोन अतिशय महत्वाची भूमिका पार पाडू शकते. यात पाण्यातदेखील ३६० अंशात व्हिडीओ छायाचित्रीकरणास सक्षम असणारा वॉटरप्रूफ व्हिडीओ कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यामुळे हवेसह पाण्यात टेहळणी करण्यासाठी हे ड्रोन अतिशय उपयुक्त ठरू शकते. सध्या तरी पाण्याखाली दहा मीटर अंतरापर्यंत हे ड्रोन जाऊ शकत असले तरी लवकरच याची मर्यादा वाढविण्यात येणार आहे.

पहा: नेव्हियेटर ड्रोनची एक झलक दर्शविणारा व्हिडीओ.