अमेझॉनचा फ्रिडम सेल सुरू : काय आहेत मुख्य ऑफर्स ?

0
अमेझॉन फ्रिडम सेल, amazon freedom sale

अमेझॉनचा फ्रिडम सेल आजपासून सुरू झाला असून यात तीन दिवसांपर्यंत विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध सेल जाहीर केले आहेत. यात आज अर्थात ९ ऑगस्टपासून अमेझॉन या कंपनीने फ्रिडम सेल या नावाने तीन दिवसीय सेलला सुरूवात केली आहे. या तीन दिवसांमध्ये डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर्स आणि कॅशबॅकच्या माध्यमातून ग्राहकांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. यातील प्रमुख आकर्षण म्हणजे अमेझॉनने एसबीआयसोबत सहकार्याचा करार केला आहे. याच्या अंतर्गत स्टेट बँकेच्या क्रेडीट अथवा डेबीट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करणार्‍या ग्राहकाला १० टक्क्यांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. अर्थात यासाठी किमान तीन हजारांची खरेदी आवश्यक आहे. तर या योजनेच्या अंतर्गत ग्राहकाला अधिकतम १५०० रूपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. अमेझॉनने आपल्या अमेझॉन पे या पेमेंट सिस्टीमचा वापर करून खरेदी करणार्‍या ग्राहकाला ५ टक्क्यांचा कॅशबॅक जाहीर केला आहे.

दरम्यान, या सेलमध्ये काही प्रॉडक्टवर तिनही दिवसांपर्यंत सवलत देण्यात आलेली आहेत. तर याच्या जोडीला दररोजही विशिष्ट प्रॉडक्टवर आकर्षक सवलती जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये स्मार्टफोनसह लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, कॅमेरे, टिव्ही, वॉशिंग मशिन्स, वायरलेस स्पीकर्स, हेडफोन्स आदींसह अन्य उपकरणांचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here