अमेझॉनचे फायर मालिकेत नवीन टॅबलेट

0
फायर एचडी ८, fire hd 8

अमेझॉनने आपल्या फायर या मालिकेत दोन नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

अमेझॉन कंपनीने फायर एचडी ८ आणि फायर एचडी ८ किड हे दोन नवीन टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अमेझॉन एचडी ८ आणि एचडी ८ किडस् हे मॉडेल अनुक्रमे ७९.९९ आणि १२९.९९ डॉलर्स मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये हे टॅबलेट भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकतात. या दोन्ही मॉडेल्समध्ये अलेक्झाचा सपोर्ट दिलेला आहे. परिणामी यावरील सर्व फंक्शन्स हे ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने कार्यान्वित करता येणार आहेत. युजरला एखादे टुल वापरायचे असल्यास तो याबाबतची व्हाईस कमांड देऊन याचा वापर करू शकतो. यामध्ये एखादे गाणे सुरू/पॉज करण्यासह ध्वनीची तीव्रता कमी/जास्त करण्याची सुविधा आहे. याच प्रकारे व्हिडीओचे सर्व नियंत्रण यात देण्यात आलेले आहे. याशिवाय यात स्मार्ट होमचे नियंत्रण, व्हिडीओ कॉल्स आदींची सुविधाही देण्यात आलेली आहे. यामध्ये शो मोड हे स्वतंत्र फिचरदेखील दिलेले आहे. यात ट्रेंडींग न्यूज, व्हिडीओज, चित्रपटांचे ट्रेलर्स, हवामानाचे अलर्ट आदींचा एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. यातील ड्युअल स्पीकर हे डॉल्बी डिजीटल प्लस आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस या तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. यामध्ये ८ इंच आकारमानाचा व एचडी (१२८० बाय ८०० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले दिला आहे. याची रॅम १.५ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १६/३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यातील मुख्य कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा एचडी क्षमतेचा आहे.

दरम्यान, अमेझॉनच्या एचडी ८ किडस हे मॉडेलमध्ये खास मुलांसाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत. यात बालकांसाठीचे ई-बुक्स, शैक्षणिक व्हिडीओज आदींचा मर्यादीत कालखंडासाठी मोफत अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये. पालकांच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here