अमेझॉन पे इएमआय दाखल : हप्त्यांनी खरेदीची प्रकिया होणार सोपी !

0
अमेझॉन पे इएमआय, amazon pay emi

अमेझॉन इंडियाने अमेझॉन पे इएमआय ही सुविधा सुरू केली असून याच्या माध्यमातून सुलभ हप्त्यांनी खरेदी करता येणार आहे.

अमेझॉन इंडियाच नव्हे तर विविध शॉपींग पोर्टल्सवरूनही इएमआय अर्थात सुलभ हप्त्यांच्या माध्यमातून करण्यात येणारी खरेदी प्रणाली लोकप्रिय झालेली आहे. विविध बँकांच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून या प्रकारची सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. अर्थात ही थर्ड पार्टी सुविधा असते. मात्र अमेझॉनने आता आपल्या भारतीय ग्राहकांसाठी स्वत:च याला प्रदान करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने अमेझॉन पे इएमआय ही सुविधा सादर करण्यात आली आहे. सध्या निवडक युजर्ससाठी हे फिचर देण्यात आलेले असून लवकरच सर्वांसाठी हे अपडेट देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याच्या अंतर्गत क्रेडीट कार्ड नसणार्‍या ग्राहकांनाही इएमआयची सुविधा देण्यात आलेली आहे.

अमेझॉन पे इएमआय या योजनेच्या अंतर्गत ग्राहकाला ६० हजार रूपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे. यासाठी ग्राहकाला आपल्या डेबीट कार्डवरून हप्ते अदा करावे लागतील. आपल्या या नवीन सुविधेसाठी अमेझॉनने एचडीएफसी, आयसीआयसीआय, महिंद्रा कोटक, कॅनरा व सिटी बँकांसोबत सहकार्याचा करार केला आहे. ग्राहकाला ३ ते १२ महिन्यांमधील हप्त्यांचा पर्याय निवडता येणार आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात फक्त ३ ते ६ महिन्यांच्या दरम्यानचे पर्याय निवडता येणार आहेत. अमेझॉन इंडियावरील विविध एक्सचेंज ऑफर्ससाठी ही सुविधा लागू करण्यात आलेली नाही. तसेच ज्वेलरी व गिफ्टकार्डलाही ही सुविधा लागू करण्यात आलेली नाही. हे फिचर सध्या इनव्हाईट ओन्ली या प्रकारात अर्थात मर्यादीत स्वरूपात उपलब्ध केले आहे. किमान आठ हजार रूपयांची खरेदी करणार्‍या ग्राहकासाठी ही सुविधा देण्यात येत आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here