अमेझॉन प्राईम म्युझिकसाठी अलेक्झाचे अपडेट

0

अमेझॉन प्राईम म्युझिकसाठी या कंपनीने आपल्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचे अपडेट सादर केले असून यामुळे युजर्सला नविन्यपूर्ण सुविधा मिळणार आहे.

अ‍ॅमेझॉन म्युझिकने अ‍ॅलेक्सावर अधिक नाविन्यपूर्ण वॉईस फिचर्सची घोषणा केली. ही सेवा फक्त त्यांचे मोबाईल अ‍ॅप आणि इको मालिकेतील उपकरणांच्या माध्यमातून ऐकल्या जाणार्‍या अ‍ॅमेझॉन प्राईम म्युझिकवरच उपलब्ध आहे. यामुळे संबंधीत सेवेचा आनंद घेणारे श्रोते या वॉईस सेवेचा वापर करत अ‍ॅलेक्साला त्यांनी काही काळ न ऐकलेली त्यांची आवडती गाणी सुरू करण्यास सांगू शकतात. तसेच यासोबत आणखी एक फिचर सादर करण्यात आले अहे. यांच्या मदतीने युजर अतिशय सुलभपणे नवीन प्लेलिस्ट तयार करू शकतो. याशिवाय युजर विद्यमान प्लेलिस्ट्समध्ये गाण्यांची भर टाकू शकणार असून यासाठी कोणतीही गाणी सर्च किंवा ब्राऊज करण्याची आवश्यकता भासणार नाही.

अ‍ॅलेक्साला विचारत अ‍ॅमेझॉन प्राईम म्युझिकवर आता आवडत्या गाण्यांचा आनंद घेणे अत्यंत सुलभ झाले आहे. यामुळे विशिष्ट गाण्यांची नावे आठवणीत ठेवण्याची किंवा ऐकलेल्या गाण्यांची यादी पुन्हा पाहण्याची गरज दूर झाली आहे. श्रोते त्यांनी अलिकडेच ऐकलेल्या गाण्यांबाबत विचारू शकतात किंवा त्यांनी काही विशिष्ट कलाकारांची किंवा विशिष्ट शैलींची गाणी काही काळाकरिता ऐकली नसतील, तर त्या गाण्यांबाबत देखील विचारू शकतात. “अ‍ॅलेक्सा, मी गेल्या आठवड्यामध्ये ऐकत होतो, ती गाणी सुरू कर” किंवा “अ‍ॅलेक्सा, मी तीन आठवड्यांपूर्वी अरजित सिंगची गाणी ऐकत होतो, ती गाणी सुरू कर”. तसेच आजच “अ‍ॅलेक्सा या गाण्यांची नवीन प्लेलिस्ट तयार कर” किंवा “विद्यमान वैयक्तिक प्लेलिस्टमध्ये विशिष्ट गाण्यांमधून एका गाण्याची भर कर” अशा प्रकारच्या व्हाईस कमांड आता देता येणार आहेत. यामुळे गाणी शोधून काढणे अत्यंत सुलभ झाले आहे.

अ‍ॅमेझॉन प्राईम म्युझिक ही एक जाहिरात-मुक्त सेवा आहे. ही सेवा ९९९ रुपयांचे वार्षिक सदस्यत्व आणि १२९ रुपयांच्या मासिक सदस्यत्वामध्ये विना अतिरिक्त खर्चासह प्रिमीयम सेवा म्हणून सादर करण्यात आली आहे. यामध्ये इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमधील लाखो आंतरराष्ट्रीय व भारतीय गाण्यांचा समावेश आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम म्युझिक अँड्रॉईड व आयओएस मोबाइल फोन अ‍ॅप्स, डेस्कटॉप अ‍ॅप व वेब प्लेअर, अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक्स व अ‍ॅमेझॉन इको डिवाईसेसवर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here