अलीबाबाचे नवीन पोर्टल

0
alibaba

अलीबाबा कंपनीने आपल्या सर्व सेवांबाबत सखोल माहिती देण्यासाठी नवीन पोर्टल कार्यान्वित केले आहे.

एक वर्षापुर्वी अलीबाबा ही कंपनी अमेरिकन शेअर बाजारात लिस्टेड झाली होती. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘आयपीओ’ आणण्याचे श्रेय अलीबाबाला मिळाले होते. या कंपनीने चीन अमेरिका व काही प्रमाणात भारतात आपला कारभार सुरू केला असला तरी जगाच्या अन्य भागांमध्ये अलीबाबाविषयी कुणाला फारशी माहिती नाही. नेमके हेच कारण लक्षात घेत आता ‘अलीबाबा डिफाइन्ड’ नावाने नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यात कंपनीचे संस्थापक जॅक मा तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी अलीबाबाचे विविध व्यवसाय, कार्यसंस्कृती तसेच चिनमधील व्यापाराच्या संधी याबाबत माहिती देणार आहेत. तसेच अमेझॉनच्या सेलर्सच्या यशोगाथादेखील यात देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने काही व्हिडीओजदेखील अपडेट करण्यात आले आहेत. अर्थात हे नवीन पोर्टल कार्यान्वित करून अलीबाबा जगातील अन्य राष्ट्रांमध्येही लवकरच कारभार सुरू करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here