असा असेल व्हिव्हो पीसी-एक्स

0

व्हिव्हो कंपनीने व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा सपोर्ट असणारा पीसी-एक्स हा कॉम्पॅक्ट पीसी सादर केला आहे.

लासा व्हेगास येथील ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो’ मध्ये व्हिव्होने आपला पीसी-एक्स प्रदर्शीत केला आहे. याची खासियत म्हणजे हा आकाराने आटोपशीर असून अगदी कुठेही सहजपण नेण्याजोगा आहे. तसेच याचे वैशिष्ट्य म्हणजे यात आभासी सत्यता म्हणजेच व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याचे वजन अवघे पाच पौंड इतके आहे. यात कोअर आय-५ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला असून याची रॅम आठ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ५१२ जीबी असेल. यात चार युएसबी ३.१ तर दोन युएसबी २.०, दोन एचडीएमआय तर सिंगल डिस्प्ले पोर्ट असेल. मार्च महिन्यात हा पीसी ग्राहकांना खरेदी करता येणार असून याचे मूल्य ७९९ डॉलर्स असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here