असुसचे दोन गेमिंग लॅपटॉप भारतात सादर

0

असुसने दोन गेमिंग लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अतिशय उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

बर्‍याच कंपन्या खास गेमर्ससाठी लॅपटॉप बाजारपेठेत उतारत असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने आता असुस या ख्यातप्राप्त कंपनीने एफएक्स५०५ आणि एफएक्स७०५ हे दोन गेमिंग लॅपटॉप भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहेत. टफ मालिकेतील या मॉडेल्सच्या विविध व्हेरियंटस्चे मूल्य अनुक्रमे ७९,९९० आणि १,२४,९९० रूपयांपासून सुरू होणार आहे. ग्राहक याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये इंटेलचा अतिशय वेगवान असा आय७-८७५०एच हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याला एनव्हिडीयाच्या जीफोर्स जीटीएक्स १०६० या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आलेली आहे. याच्या मदतीने युजरला अतिशय उच्च ग्राफीक्सने युक्त असणार्‍या गेम्सचा आनंद घेता येणार आहे. गेमिंग लॅपटॉप हे लवकर गरम होत असतात. या अनुषंगाने या दोन्ही मॉडेल्समध्ये दोन पंख्यांचा समावेश असणारी अँटी डस्ट या प्रकारातील कुलींग सिस्टीम देण्यात आलेली आहे. यामुळे दीर्घ काळापर्यंत गेम्स खेळले तरी हे लॅपटॉप गरम होणार नसल्याचा दावा असुस कंपनीने केला आहे.

असुसचे हे दोन्ही गेमिंग लॅपटॉप अतिशय सुपर स्लीम व नॅनोएज या प्रकारातील आहेत. यांचे आकारमान अनुक्रमे १५.६ व १७.३ इंच इतके आहे. यांच्या विविध व्हेरियंयमध्ये ३२ जीबी इतकी रॅम तर स्टोअरेजसाठी १ टेराबाईटपर्यंचे पर्याय देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here