अॅपवरून ऑटो भाड्याने मिळवा !

0

ऑटो रिक्षा भाड्याने चालविण्याची सुविधा आता ‘झुम कार’ या स्मार्टफोन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे.

‘झुम कार’ या अॅप्लीकेशनच्या मदतीने कुणीही कार भाड्याने चालविण्यासाठी घेऊ शकतात. ओला/उबेर आदी कंपन्यांच्या विपरीत ‘झुम कार’मधून घेतलेली कार संबंधीत व्यक्तीला स्वत: चालवावी लागते. तास, दिवस, सप्ताह आणि महिना या विविध पातळीवर या माध्यमातून कार भाड्याने घेता येते. ही सेवा हळूहळू लोकप्रिय झाली आहे. आता या सेवेचा विस्तार करत हीच सेवा ऑटो रिक्षांसाठी लागू करण्याची घोषणा केली आहे.

या माध्यमातून अर्ध्या तासासाठी कुणीही ४० रूपये मोजून रिक्षा भाड्याने चालवू शकतो. सुरवातीला दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई व हैदराबाद या शहरांमध्ये ही सेवा प्रायोगित तत्वावर सुरू करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये याचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती ‘झुम कार’तर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here