अ‍ॅपल मॅकबुक एयर-२०१८ : जाणून घ्या सर्व फिचर्स

0
अ‍ॅपल मॅकबुक एयर-२०१८, apple macbook air-2018

अ‍ॅपल कंपनीने आपल्या मॅकबुक एयर मॉडेलची नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात आधीपेक्षा दर्जेदार फिचर्स देण्यात आले आहेत.

अ‍ॅपलने न्यूयॉर्क शहरात आयोजित केलेल्या लाँचींग कार्यक्रमात मॅकबुक एयर-२०१८ या मॉडेलची घोषणा केली. अर्थात ही या नोटबुकची अद्ययावत आवृत्ती असून यात आधीच्या मॉडेलपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात रेटीना डिस्प्ले आणि टच आयडी यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. टच आयडीच्या माध्यमातून यात बायोमॅटीक ऑथेंटीकेशन प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १३.३ इंच आकारमानाचा आणि एज-टू-एज या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याचे वजन फक्त १.३४ किलो इतके असल्याने ते सहजपणे वापरता येते. यात इंटेलचा आठव्या पिढीतील प्रोसेसर असेल. यात १६ जीबीपर्यंत रॅम तर १.५ टेराबाईटपर्यंत स्टोअरेजचे पर्याय दिलेले आहेत. यात अद्ययावत कि-बोर्ड दिलेला आहे. तर या मॉडेलमध्ये आधीपेक्षा दर्जेदार ध्वनी प्रणालीदेखील दिलेली आहे.

अ‍ॅपल मॅकबुक एयर-२०१८ या मॉडेलमधील बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १२ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात युएसबी टाईप-सी, थंडरबोल्ट पोर्ट आदींचे पर्याय देण्यात आले आहेत. या मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १,१९९ डॉलर्सपासून सुरू होणार असून लवकरच याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here