अ‍ॅपल मॅक मिनी मॉडेलची अद्ययावत आवृत्ती

0
अ‍ॅपल मॅक मिनी 2018,apple-mac-mini-2018

अ‍ॅपलने आपल्या मॅक मिनी या संगणकाची नवीन अद्ययावत आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.

अ‍ॅपलने आपल्या न्यूयॉर्क शहरात आयोजित केलेल्या लाँचींग कार्यक्रमात विविध मॉडेल्सच्या नवीन आवृत्त्या सादर केल्या. यात मॅक मिनी या संगणकालाही नवीन स्वरूपात सादर करण्याचे जाहीर करण्यात आले. विशेष बाब म्हणजे तब्बल चार वर्षानंतर मॅक मिनी मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे. हे आजपर्यंतचे सर्वात गतीमान मॉडेल असेल असे अ‍ॅपलने जाहीर केले आहे. अर्थात आधीच्या मॉडेलपेक्षा यात अतिशय उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंटेलच्या आठव्या पिढीतील विविध प्रोसेसर्सचे पर्याय दिलेले असून यामुळे अतिशय गतीमान कंप्युटींग शक्य आहे. आधीपेक्षा ६० टक्के अधिक ग्राफीक्स आणि ५ पटीने वेगवान असे हे मॉडेल असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात ६४ जीबीपर्यंत रॅम तर २ टेराबाईटपर्यंत स्टोअरेजचे पर्याय प्रदान करण्यात आले आहेत.

मॅक मिनी मॉडेलमध्ये अ‍ॅपलची टी२ ही सिक्युरिटी चीप दिलेली आहे. यामुळे युजरला अतिशय सुरक्षितपणे लॉगीन करता येणार आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये युएसबी टाईप-ए, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, इथरनेट, थंडरबोल्ट, ऑडिओ जॅक आदी पर्याय प्रदान करण्यात आले आहेत. याचे विविध व्हेरियंटचे मूल्य ७९९ डॉलर्सपासून सुरू होणार असून हे मॉडेल लवकरच भारतात लाँच करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here