अ‍ॅमेझॉनचा ‘एमएव्हीआयएम’सोबत सहकार्याचा करार

0
amazon

अ‍ॅमेझॉन इंडियाने ’सहेली’ या आपल्या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी, महिला आर्थिक विकास महामंडळ (एमएव्हीआयएम) सोबत सामंजस्य करार केल्याची घोषणा केली.

या भागीदारीच्या माध्यमातून, सहभाग संस्था, मुख्यमंत्री कार्यालयातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेल, महाराष्ट्र सरकार यांच्या साह्याने अ‍ॅमेझॉन इंडिया या संस्थेशी निगडित महिलांच्या सबलीकरणात साह्य करेल आणि देशभरातील अ‍ॅमेझॉन ग्राहकांसमोर आपली उप्तादने मांडण्यासाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देईल. या भागीदारीचा एक भाग म्हणून, एमएव्हीआयएम”शी संबंधित महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ध्येय अ‍ॅमेझॉन इंडियाने बाळगले असून त्यांना शून्य प्रारंभिक खर्चावर ऑनलाइन विक्री सुरू करण्यास सक्षम करण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. यामध्ये पहिल्या ३ महिन्यांसाठी अमर्यादित ऑनबोर्डिंग सहाय्य, इमेजिंग आणि कॅटलॉगिंग, उत्पादन सूची निर्मिती, अनुदानित संदर्भ शुल्क आणि विनामूल्य खाते व्यवस्थापन या सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

अ‍ॅमेझॉन सहेली हा उपक्रम नोव्हेंबर २०१७ मध्ये एसईडब्लूए (सेवा) आणि इम्पल्स सोशल एण्टरप्राईजशी भागीदारी करून सादर करण्यात आला असून महिला उद्योजकांच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांची रेंज सध्या या व्यासपीठावर उपलब्ध आहे. महिला उद्योजकांना ऑनलाईन विक्रीबद्दल माहिती करून देण्यासाठी तसेच, अ‍ॅमेझॉनवरील व्यापारवृद्धीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्यासाठी या उपक्रमांतर्गत भागीदारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते व कौशल्य विकास कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये उत्पादन सूचीची निर्मिती, इमेजिंग, कॅटलॉगिंग, पॅकेजिंग आणि शिपिंग, इन्व्हेण्टरी आणि खाते व्यवस्थापन तसेच, ग्राहक सेवा या विषयांवरील सत्रांचा समावेश असतो. या कार्यशाळा मोफत असून सहाय्यभूत ऑनबोर्डिंग आणि मार्गदर्शन सत्रेही या अंतर्गत राबवण्यात येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here