आकर्षक डिझाईनसह लिंक्डइनचा कायापालट

0
linkedin

लिंक्डइन या प्रोफेशनल सोशल नेटवर्कने आकर्षक डिझाईनसह आपले रूप बदलले आहे. डेस्कटॉप आवृत्तीसाठी हा बदल करण्यात आला आहे.

अलीकडेच मायक्रोसॉफ्टने मोठी किंमत मोजून लिंक्डइन ही प्रोफेशनल नेटवर्क साईट खरेदी केली. यानंतर यात फार मोठे बदल होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. या अनुषंगाने आता याचा युजर इंटरफेस बदलण्यात आला आहे. नवीन इंटरफेस हा अधिक सुटसुटीत आणि नेव्हिगेशनसाठी सुलभ असा आहे. नवी डिझाईन ही फेसबुकसारखी असल्याचे दिसून येत आहे. अर्थात याच्या वर डाव्या बाजूला प्रोफाईल फोटो असून मध्यभागापासून न्यूज फिड देण्यात आली आहे. याच्या वरील बाजूस कोणत्याही युजरला हवा असणारा व्यक्ती, जॉब, कंपनी आदी सुलभपणे शोधण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या वरील बाजूस होम, मॅसेजिंग, जॉब्ज, नोटिफिकेशन, मी, माय नेटवर्क आणि सर्च असे स्वतंत्र भाग देण्यात आले आहेत. यात उत्तम दर्जाची चॅटींगची सुविधाही देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here