आक्षेपार्ह ट्विट करण्याआधी मिळणार वॉर्निंग !

0
twitter app, ट्विटर

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी एक फिचरच्या माध्यमातून आक्षेपार्ह ट्विट करण्याआधी याबाबतचा इशारा देण्याची सुविधा प्रदान केली आहे.

ट्विटरवर एडिट हे फिचर कधी येणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्से यांनी याबाबत सूतोवाच करून अनेक महिने उलटले असले तरी या संदर्भात कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे ट्विट संपादीत करण्याची सुविधा मिळालेली नसतांना ट्विटरने एक अनोखे फिचर आपल्या युजर्सला सादर करण्याची घोषणा केली आहे. हे फिचर आयओएस प्रणालीच्या निवडक युजर्सला प्रदान करण्यात आले असून लवकरच ते आयओएस व अँड्रॉइडसह डेस्कटॉपवरून ट्विटरचा वापर करणार्‍यांना उपलब्ध होणार आहे.

कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सच्या मदतीने हे फिचर कार्यान्वित करण्यात येत आहे. यात कुण्याही युजरने आपल्या ट्विटमध्ये आक्षेपार्ह शब्द, प्रतिमा वा व्हिडीओचा समावेश केला असता हे ट्विट करण्या आधी त्याला संबंधीत ट्विटमध्ये आक्षेपार्ह कंटेंटचा समावेश असल्याचा इशारा देण्यात येईल. याआधी अनेकांनी आक्षेप नोंदविलेल्या कंटेंटचा यात समावेश असल्याचे त्याला सांगण्यात येईल. यामुळे हे ट्विट करण्याआधी थोडा विचार करावा असे त्याला सुचविण्यात येईल. हा इशारा पॉप-अप या प्रकारातील विंडोच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजेच संबंधीत ट्विट करण्याआधी यावर विचार करण्याचे याद्वारे सुचविण्यात येईल. अर्थात, यानंतर ट्विट करावे की नाही याचा निर्णय हा सर्वस्वी युजरचा राहणार आहे. म्हणजे, हे फिचर फक्त इशारा देण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

दरम्यान, यासोबत ट्विटरने रिप्लाईजसाठी नवीन ले-आऊट देण्याची तयारी देखील सुरू केली आहे. या संदर्भात केलेले ट्विट आणि यातील व्हिडीओ हे आपण खाली पाहू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here