वाहकाविना चालणार्या कारबाबत जगात प्रचंड कुतुहल निर्माण झाले असतांनाच चीनमध्ये आता याच प्रकारची बस तयार करण्यात आली आहे.
गुगलसह अन्य कंपन्यांनी वाहकाविना चालणारी कार तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यापैकी गुगल ही कंपनी तर आपल्या ड्रायव्हरलेस कारच्या चाचण्यांबाबत अधिकृत माहितीदेखील जाहीर करत असते. तर अन्य कंपन्या गुप्तपणे याच्या चाचण्या घेत आहेत. ड्रायव्हरलेस कार ही आता व्यावसायिक पातळीवर कधी उपलब्ध होणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. हे सुरू असतांना आता चीनमध्ये ड्रायव्हरलेस बस यशस्वीपणे रस्त्यावर चालविण्यात आली आहे.
ही बस अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टम, उच्च दर्जाचे सेन्सर्स, लेसर रडार्स, कॅमेरे आदींनी युक्त आहे. कोणत्याही ड्रायव्हरविना ही बस अगदी गजबजलेल्या रस्त्यांवरून सुरक्षितपणे फिरत असल्याचे चाचणीतून दिसून आले आहे. योतुंग बस कंपनीने ही चाचणी घेतली आहे. ही बस साडेदहा मीटर लांब आहे. अर्थात संबंधीत कंपनीने याबाबत अन्य सविस्तर विवरण अद्याप जाहीर केलेले नाही.