आता फक्त २९९ रूपयात मोबाईल

0

रिलायन्सच्या जिओफोनची नोंदणी सुरू झाली असतांना डेटेल या कंपनीने अवघ्या २९९ रूपयात मोबाईल हँडसेट सादर करण्याची घोषणा केली आहे.

जिओफोनच्या नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात या माध्यमातून देशात स्वस्तात स्वस्त मोबाईल उत्पादनाची स्पर्धादेखील सुरू झाली आहे. यात दिल्ली येथील डेटेल या कंपनीने उडी घेत डीटेल डी-१ हे मॉडेल अवघ्या २९९ रूपयात उपलब्ध करण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. जिओफोनमध्ये १५०० रूपये तीन वर्षांसाठी अनामत रकमेच्या स्वरूपात घेऊन स्मार्टफोन दिला जाणार आहे. या तुलनेत फक्त २९९ रूपयात येणारा डेटेल डी-१ हा मोबाईल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

डेटेल डी-१ या मॉडेलमध्ये १.४४ इंच आकारमानाचा मोनोक्रोम कृष्णधवल डिस्प्ले असेल. यात ६५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १५ दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात टॉर्च लाईट, एफएम रेडिओ आदी फिचर्स देण्यात आले आहेत. तथापि, यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली नसून यात सिंगल सीमकार्डचा सपोर्ट असेल. खरं तर या मोबाईल हँडसेटचे मूळ मूल्य १६६.६६ रूपये आहे. तथापि, जीएसटीसह याचे मूल्य २९९ रूपये असून हा मोबाईल कंपनीच्या संकेतस्थळावरून कुणीही खरेदी करू शकेल. याआधी फ्रिडम-२५१ हा मोबाईल अवघ्या २५१ रूपयांत उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, याच्या विक्रीचा फियास्को झाल्याचे दिसून आले होते. या पार्श्‍वभूमिवर डेटेल डी-१ हा मोबाईल ग्राहकांच्या कितपत पसंतीस उतरतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here