आता येणार इलेक्ट्रिक बस

0

इलेक्ट्रीकवर चालणार्‍या कार हळूहळू लोकप्रिय होत असतांना आता ‘प्रोटेरा’ या कंपनीने विजेवरच चालणारी बस तयार केली आहे. याच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक प्रणालीत क्रांती घडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इलेक्ट्रीक कार आता लोकप्रिय होत आहेत. अमेरिकेतील टेसला ही कंपनी या प्रकारच्या कारच्या उत्पादनासाठी विख्यात आहे. काही कार उत्पादकांनी तर पेट्रोल/डिझेलसह इलेक्ट्रीक चार्जींगवर चालणार्‍या ‘हायब्रीड’ कार निर्मितीला प्राधान्य दिले आहे. अर्थात या क्षणाला पर्यावरणानुकुल कार निर्मितीला वेग आला आहे. या पार्श्‍वभुमिवर ‘प्रोटेरा’ या कंपनीने इलेक्ट्रीक बस तयार केली आहे.

ही बस एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २५८ मैल अंतरापर्यंत चालू शकते. अर्थात ‘सिटी बस’ म्हणून या प्रकारची बस उपयुक्त ठरू शकते. या कंपनीची स्थापना रेयॉन पोपल यांनी केली आहे. ते टेसला कंपनीचे माजी कर्मचारी आहेत. डिझेलवर चालणार्‍या बसेस या प्रदुषणासाठी कुख्यात आहेत. यामुळे इलेक्ट्रीक बसच्या माध्यमातून शुन्य उत्सर्जनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. याचसोबत वाहतुकीचा खर्चही कमी होणार असल्याने हा पर्याय योग्य ठरणार असल्याचा दावा पोपल यांनी केला आहे. त्यांनी आपल्या इलेक्ट्रीक बसचे मॉडेलही सादर केले आहे. मात्र ते व्यावसायिक पातळीवर कधी सादर करण्यात येईल याबाबत माहिती त्यांनी दिलेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांमध्ये ही बस बाजारपेठेत सादर होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here