आता व्हाटसअ‍ॅपवर भाषांतराची सुविधा

0

गुगल ट्रान्सलेटच्या ताज्या अपडेटमध्ये ‘इन अ‍ॅप ट्रान्सलेशन’ची सुविधा प्रदान करण्यात आल्याने आता कुणीही व्हाटसअ‍ॅपवरून सहजगत्या भाषांतर करत चॅटींग करू शकणार आहे.

गुगल ट्रान्सलेटचा जगभरातील तब्बल ५० कोटींपेक्षा जास्त युजर्स वापर करतात. याच्या माध्यमातून जगातील १०३ भाषांचा आपसात अनुवाद करणे शक्य आहे. आता गुगल ट्रान्सलेटच्या ताज्या अपडेटमध्ये नाविन्यपुर्ण फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने आता कुणीही ‘इन अ‍ॅप ट्रान्सलेशन’ करू शकणार आहे. याचाच अर्थ असा की, कोणत्याही अ‍ॅपमध्ये टाईप करतांना त्या अ‍ॅपवरून ‘गुगल ट्रान्सलेट’ला रिडायरेक्ट न होता अनुवाद करता येणार आहे. याचा सर्व अ‍ॅप तसेच मॅसेंजर वापरणार्‍यांना लाभ होणार आहे. अर्थात याचा सर्वात जास्त उपयोग व्हाटसअ‍ॅप युजर्सला होणार आहे.

गुगल ट्रान्सलेटचे ताजे अपडेट मिळवल्यानंतर आपण जेव्हाही कुणीशी वैयक्तीक चॅटींग करू तेव्हा उजव्या बाजूला कोपर्‍यावर ‘गुगल ट्रान्सलेट’चा आयकॉन येईल. यात आपल्याला समोरच्या व्यक्तीने पाठविलेले वाक्य दुसर्‍या भाषेत हवे का? याची विचारणा करणारी ‘पॉप अप विंडो’ येईल. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हाटसअ‍ॅपवरून दुसरीकडे न जाता आपोआप हव्या त्या भाषेत अनुवाद करता येईल. अर्थात आपण परकीय भाषांमधूनही सहजगत्या चॅटींग करू शकतो. ही सुविधा अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आली आहे. अँड्रॉईडच्या जेलीबीन आवृत्तीच्या पुढील व्हर्शन्सवर ही सुविधा मिळणार आहे. या अपडेटमध्ये आयओएस युजर्स या सुविधेचा ‘ऑफलाईन’ वापर करू शकतील. (अँड्रॉईडसाठी ऑफलाईन सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे.) तर याच अपडेटमध्ये चिनी भाषेसाठी ‘वर्ड लेन्स’ हे फिचरदेखील देण्यात आले आहे. याच्या मदतीने चित्रांमधील चिनी भाषेतील शब्दांचा अनुवाद करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here