आता सिनेमागृहातही एलईडी स्क्रीन

0

सॅमसंग कंपनीने जगातील पहिला एलईडी थिएटर स्क्रीन तयार केला असून यावर फोर-के आणि एचडीआर तंत्रज्ञानाने युक्त असणारे चित्रपट पाहता येतील.

अनेक आधुनीक उपकरणांमध्ये एलईडी स्क्रीन हा अविभाज्य घटक बनला आहे. विशेष करून अलीकडच्या काळात एलईडी डिस्प्लेंचे टिव्ही लोकप्रिय झाले आहेत. यातच आता फोर-के म्हणजेच क्युएचडी रेझोल्युशन क्षमता आणि एचडीआर या प्रणालीही लोकप्रिय झाल्या आहेत. फोर-के तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय सुस्पष्ट चित्र दिसते तर एचडीआरमुळे उत्तम दर्जाचा कॉन्ट्रास्ट रेशो मिळत असून अर्थात यामुळेदेखील उत्तम प्रतिचे चित्रीकरण पाहता येते. नेमक्या याच तीन फिचर्सनी सज्ज असणारा थिएटर डिस्प्ले सॅमसंग कंपनीने विकसित केला आहे. मार्च महिन्याला याला पहिल्यांदा प्रदर्शीत करण्यात आले होते. आता दक्षिण कोरियातल्या वर्ल्ड टॉवरमध्ये असणार्‍या लोट्टे सिनेमा या चित्रपटगृहात याला इन्स्टॉल करण्यात आले आहे. याचा आकार ३४ फुट इतका असून विद्यमान सिनेमा डिस्प्लेंच्या तुलनेत तो थोडा कमी असला तरी दर्जाबाबत तो उजवा आहेच.

वास्तविक पाहता सध्या अतिशय उत्तम दर्जाचे प्रोजेक्टर्स उपलब्ध असून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये याचाच वापर केला जात आहे. मात्र सॅमसंगचा एलईडी डिस्प्ले आता प्रोजेक्टरचे युग संपुष्टात आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ४०९६ बाय २१६० पिक्सल्स क्षमतेच्या एलईडी डिस्प्लेवर फोर-के आणि एचडीआरयुक्त अगदी सजीव दिसणार्‍या चलचित्राचा आनंद घेता येणार आहे. या एलईडी स्क्रीनवर पारंपरिक प्रोजेक्टरपेक्षा तब्बल दहा पटींनी अधिक चांगले चलचित्र दिसत असल्याचा सॅमसंग कंपनीचा दावा आहे. याला हर्मनच्या अत्युच्च दर्जाच्या ध्वनी प्रणालीची जोड देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here