आयओएस प्रणालीतूनही लोकेशन शेअरिंगचा धोका

0

अँड्रॉइडच्या पाठोपाठ आता आयओएस प्रणालीच्या युजर्सलाही काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकेशन शेअरिंगचा धोका असल्याचे उघडकीस आले आहे.

अलीकडेच अँड्रॉइड प्रणालीच्या माध्यमातून लोकेशन शेअरिंग होत असल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली होती. विशेषत: युजरने हा पर्याय ऑफ केलेला असला तरीही लोकेशन शेअरींगची माहिती उघड होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. यावर गुगलने उपायोजना करण्याची माहिती दिली असली तरी यामुळे जगभरातील युजर्सचे परिपूर्ण समाधान झालेले नाही. दरम्यान, यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आयओएस प्रणालीतूनही हाच प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. गार्डिअप अ‍ॅपची मालकी असणार्‍या सुडो सिक्युरिटी ग्रुप या सायबर सुरक्षेतील आघाडीच्या कंपनीने हा प्रकार जगासमोर आणला आहे. यानुसार आयओएस प्रणालीवर चालणारे सुमारे दोन डझन अ‍ॅप्स हे युजर्सच्या लोकेशनची माहिती चोरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात आस्कएफएम, क्लासीफाईड २.० मार्केटप्लेस, टापाटॉक आदी लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे.

संबंधीत अ‍ॅप्स हे युजर्सचे भौगोलिक लोकेशन तसेच त्याच्या ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटीच्या माध्यमातून त्या युजरची सर्वांगीण माहिती जमा करते. याशिवाय संबंधीत युजरच्या सेल्युलर पुरवठा कंपनीबाबतही माहिती जमा केली जातो. अर्थात यातून त्या युजरचा कॉल-लॉगही चोरला जातो. यानंतर हा डाटा त्रयस्थ (थर्ड-पार्टी) कंपन्यांना विकला जातो. या कंपन्या संबंधीत माहितीच्या आधारे मार्केटींग करून पैसा कमवत असल्याचे सुडो सिक्युरिटी ग्रुपच्या अध्ययनातून दिसून आले आहे. वास्तविक पाहता, युजर्स आपल्या लोकेशन तसेच अन्य माहितीचा अ‍ॅक्सेस नाकारू शकतो. मात्र असे असूनही माहिती जमा करण्यात असल्याचा दावा या अध्ययनात करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here