आयमॅक प्रो संगणक भारतात दाखल

0

अ‍ॅपलने अलीकडेच जाहीर केलेला आयमॅक प्रो हा उच्च श्रेणीतील संगणक आता भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

अ‍ॅपल कंपनीने आपल्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा आयमॅक प्रो या मॉडेलचे अनावरण केले होते. यानंतर हा संगणक अमेरिकेसह काही राष्ट्रांमध्ये सादर करण्यात आला होता. आता हे मॉडेल भारतीय ग्राहकांना ४,१५,००० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. याचे मूल्य हे अन्ये प्रिमीयम मॉडेल्सच्या तुलनेत खूप जास्त असले तरी यातील फिचर्सदेखील त्याच तोलामोलाचे आहेत. यामध्ये २७ इंच आकारमानाचा आणि ५-के म्हणजेच ५१२० बाय २८८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ८ कोअर इंटेल झेनॉन डब्ल्यू हा वर्कस्टेशन्समध्ये वापरला जाणारा अतिशय गतीमान असा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ३२ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १ टेराबाईट इतके असेल. अत्युच्च दर्जाच्या ग्राफीक्सची अनुभूती यावी यासाठी यामध्ये ८ जीबी रॅम असणारे एएमडी रेडॉन प्रो वेगा ५६ हा व्हिडीओ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे.

आयमॅक प्रो या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी, एचडीएमआय, थंडरबोल्ट, इथरनेट आदी पर्याय देण्यात आले आहेत. यासोबत अतिशय दर्जेदार असा किबोर्ड, माऊस आदी प्रदान करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here