आयव्हुमीचे किफायतशीर स्मार्टफोन

0

आयव्हुमी कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारे आयव्हुमी मी आणि मी १ प्लस हे दोन मॉडेल अनुक्रमे ३,९९९ आणि ४,९९९ रूपये मुल्यात भारतात सादर केले आहेत.

आयव्हुमी मी आणि मी १ प्लस हे दोन्ही मॉडेल ग्राहकांना ‘शॉपक्लुज’ या ई-पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. दोन्ही मॉडेलमध्ये वर नमूद केल्यानुसार फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असल्याने ते जिओसह अन्य सेवांसह वापरता येणार आहे. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहेत.

आयव्हुमी मी या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले वक्राकार २.५ डी ग्लास डिस्प्ले असेल. १.२ गेगाहर्टझ क्वाड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर सेल्फीसाठीही ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. फास्ट चार्ज तंत्रज्ञानासह यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर आयव्हुमी मी १ प्लस या मॉडेलमध्येही पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले वक्राकार २.५ डी ग्लास डिस्प्ले असेल. १.२ गेगाहर्टझ क्वाड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. तर यात क्विकचार्ज २.० तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३००० मिलीअँपिअर प्रति तास या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here